
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडण्यात आलं. यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली, विरोधकांनी याला जोरदार विरोध दर्शवला.
तसंच देशभरातून यावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. त्यातच आता समाजवादी पार्टीचे मुंबईतील आमदार अबू आझमी यांनी देखील भाष्य केलं आहे. या विधेयकाच्या निमित्त त्यांनी केंद्र सरकारला उलटा प्रश्न विचारला आहे.