
Prakash Bhoir
ESakal
डोंबिवली : केडीएमसीचे माजी विरोधी पक्ष नेते आणि मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना लेखी पत्र देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना हरकती घेतल्या आहेत.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग रचना नियमांचे उल्लंघन करुन झाल्या आहेत, असे भोईर यांनी सांगितले आणि याबाबत ते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्ताची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन देणार आहेत.