
मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना बदलणार; शिवसेना 'अॅक्शन मोड'मध्ये
मुंबई - राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा एकदा बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात नव्याने स्थापन झालेलं एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना बदलणार असल्याच निश्चित झाल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसेच २०१७ मधील प्रभाग रचनेनुसारच निवडणूक घेण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या वृत्तानंतर शिवसेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. (Municipal corporation election news in marathi)
हेही वाचा: Breaking : महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना; कॅबिनेटचा निर्णय?
नव्या सरकारने महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली प्रभागरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना ऍक्शनमोडमध्ये आली असून शिवसेनेकडून मातोश्रीवर तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कायदेशीर बाजुंचा अभ्यास करणार असल्याचं समजतं. प्रभाग रचना बदलल्यामुळे शिवसेनेला मुंबईत फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यता येत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हालचाली सुरू केल्या आहेत.
नवीन सरकार आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर २०१७ ला वॉर्ड रचना झाला होती. त्यानंतर जनगणना झालीच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड रचना चुकीची आहे, अशी भूमिका भाजपने आधीच घेतली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जुन्या वॉर्ड रचनेसंदर्भातील चर्चा झाली.
हेही वाचा: ...तर मग उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल; अब्दुल सत्तार यांचा थेट इशारा
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील प्रभाग रचना बदलण्याच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी म्हटलं की, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहोत. तसेच प्रभाग रचना बदलल्यास निवडणुका पुन्हा लांबू शकतात, असंही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेत २२७ वॉर्ड होते. मात्र ते वाढवून २३६ करण्यात आले होते. या व्यतिरिक्त पुण्यासह अनेक महापालिकांमध्ये वॉर्ड वाढवण्यात आले होते. त्यामुळे या सर्व निवडणुका २०१७ च्या वॉर्ड रचनेनुसार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास आरक्षणात मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे आरक्षण सोडत नव्याने निघू शकतात. शिवाय निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल.
Web Title: Ward Structure In Mumbai Municipal Corporation Will Change Shiv Sena In Action Mode
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..