गोदामातील किडे घरांत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

ऐरोली - तुर्भे सेक्‍टर २० परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामात मोठ्या प्रमाणात तृणधान्य आणि डाळींचे साठे आहेत. त्यावर पडलेल्या कीड आणि किटक हे परिसरातील घरांत गेले असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. त्याची दखल स्थानिक नगरसेविका शुभांगी पाटील यांनी घेऊन योग्य उपाययोजना न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा गोदाम अधिकाऱ्यांना दिला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

तुर्भे सेक्‍टर २० येथे सीडब्ल्यूसीचे गोदाम आहे. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या धान्यावर नियमित धुरीकरण आणि फवारणी न केल्याने  मोठ्या प्रमाणात कीड आणि किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. हे किटक परिसरातील घरात प्रवेश करीत आहेत. ते नागरिकांच्या जेवणात, पाण्यात शिरतात. त्यांच्या दंशामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण निर्माण झाला आहे. 

रहिवाशांच्या तक्रारीनंतर एक महिन्यांपूर्वी आमदार संदीप नाईक आणि नगरसेविका शुभांगी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या तक्रारी मांडल्या होत्या. त्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची अधिकाऱ्यांनी पूर्तता न केल्याने पाटील यांनी काल पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी सीडब्ल्यूसीचे विभागीय व्यवस्थापक ए. के. दुबे यांनी चार दिवसांत गोदामाच्या खिडक्‍यांना हिरवी जाळी लावण्याचे आश्‍वासन दिले; परंतु या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. माजी नगरसेवक विवेक पाटील यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीडब्ल्यूसीच्या गोदामातून येणाऱ्या किटकांमुळे रहिवासी दोन महिन्यीांपासून त्रस्त आहेत. जेवण, पाणी, कपड्यात किडे असल्याने त्यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
- विलासिनी शिरवाडकर, रहिवासी, तुर्भे

गोदामातून घरात येणाऱ्या किटकांचा प्रश्‍न चार दिवसांत सुटला नाही, तर गोदामाच्या गेटवर उपोषण करण्यात येणार आहे.
- शुभांगी पाटील, नगरसेविका 

Web Title: Warehouse insects in the house