

AIMIM leader and former MLA Waris Pathan
Sakal
मुंबई: सर्वधर्मसमभावावर राज्यघटनेत भर दिला आहे. तरीही मुंबईचा महापौर मुस्लिम होणार नाही असे भाजप नेते म्हणतात. आपल्या देशात मुस्लिम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती होतो. अनेक आमदार-खासदार मुस्लिम आहेत; मग मुंबईचा महापौर मुस्लिम का होऊ शकत नाही? मुंबईकर साथ देतील, त्यामुळे एक दिवस नक्कीच मुस्लिम महापौर झालेला दिसेल, असे प्रतिपादन एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ संवाद’ या कार्यक्रमात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.