WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून मुंबई पालिकेसह धारावी पॅटर्नचं तोंडभरुन कौतुक

WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून मुंबई पालिकेसह धारावी पॅटर्नचं तोंडभरुन कौतुक

मुंबईः  जागतिक स्तरावरील प्रसिद्ध वृतपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टनं  धारावी पॅटर्नसह मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावी पॅटर्नची दखल यापूर्वीही जागतिक स्तरावर घेतली आहे. कोरोनाचा प्रसार वेगानं होऊ लागल्याने धारावीमधील परिस्थिती चिंताजनक होत असताना मुंबई महापालिकेने कौतुकास्पद कामगिरी करत कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. 

सध्या धारावी पॅटर्नचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आल्यानंतर आता वॉशिंग्टन पोस्टनेही धारावीमधील कामगिरीची दखल घेतली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केल्यानंतर आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनं देखील या कामाची दखल घेत गौरव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जात आहे. वॉशिंग्टन पोस्टने मुंबई महापालिकेने धारावीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे. याआधी त्यांनी मुंबईसहित इतर महत्त्वाच्या शहरांमधील करोनाची माहिती देण्यासाठी दाखवलेल्या पारदर्शकतेबद्दल कौतुक केलं होतं.

वॉशिंग्टन पोस्टनं शुक्रवारी ३१ जुलै रोजी धारावी पॅटर्नवर आधारित ‘How a packed slum in Mumbai beat back the coronavirus, as India’s cases continue to soar’ हा लेख प्रसिद्ध केला. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी पारदर्शक असून पालिकेचे काम परिणामकारक असल्याचं मत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या लेखातून व्यक्त केलं.  धारावीमधील कोरोनाविरोधातील लढा घनदाट वस्ती असणाऱ्या अनेक शेजारी तसंच खास करुन विकसित देशांसाठी महत्त्वाचा धडा असल्याचं लेखात म्हटलं आहे.  डोक्यावर कोरोना संकट असताना धारावीने केलेले उपाय, समुदायाचा सहभाग आणि चिकाटी ही दखलपात्र असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

वॉशिंग्टन पोस्टनं कौतुक केलं असलं तरी या यशाने हुरळून न जाता यापुढेही कोरोनाविरुद्धचा लढा सुरु राहणार असल्याचा निर्धार मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

धारावीत केवळ ७२ अॅक्टिव्ह रुग्ण 

धारावी हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता या भागात केवळ ७२ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी धारावीत केवळ ४ रुग्ण आढळून आले. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण सापडलेत. त्यापैकी २२३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

Washington Post praises Dharavi model Coronavirus appreciated Brihanmumbai Municipal Corporation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com