वसई : पावसाळा सुरु झाल्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड होत असतात आणि त्याचा थेट परिणाम हा रहिवाशांवर होत असतो. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून वीज खंडित होत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातुन पुरवठा केले जाणारे पिण्याचे पाणी पुढील ४ दिवस शहराला कमी दाबाने तसेच अनियमित होणार असल्याने नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.