पाणीबाणी! वसईत हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

वसई - विरार पालिकेने काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु केला असला तरी तो मुबलक प्रमाणात नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वसई : वसई तालुक्यातील सातिवली, फादरवाडी श्रीरामनगर, संतोषभुवन, धानीवबाग, रामरहीम नगर , बिलालपाडा , गावराईपाडा मार्ग , पेल्हार, मुंबई - अहमदाबाद महामार्ग परिसर, चिंचोटी, कामण आदी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत  असताना हंडाभर पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरूच आहेत.   

हेही वाचा: वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

वसई - विरार पालिकेने काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु केला असला तरी तो मुबलक प्रमाणात नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. पालिकेची नळजोडणी मिळाली नाही. पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. रोजगाराचे साधन नसल्याची खंत नालासोपारा येथील रहिवासी प्रमोद राय यांनी व्यक्त केली.                                                                        

महत्वाची बातमी : वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी नळजोडणीचे काम सुरू आहे. वसई पूर्वेकडील कामण, चिंचोटीसह जेथे पाण्याची समस्या आहे. तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळजोडणीसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करून व नियमाप्रमाणे नळजोडणी दिली जाते. नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावू नये; यासाठी खबरदारी घेण्यात येईल.
- सुरेंद्र ठाकरे, अभियंता, वसई- विरार महापालिका

water crisis In Vasai, severe strike against the administration


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water crisis In Vasai, severe strike against the administration