'सूर्या'ची जलवाहिनी फुटली वसई-विरारला पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

वसई - वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची जलवाहिनी फुटल्यामुळे वसईकरांना तीन ते चार दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

वसई - वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची जलवाहिनी फुटल्यामुळे वसईकरांना तीन ते चार दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

धुकटन येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्ध केल्यानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येणाऱ्या पाईपलाईनद्वारे वसईत पाणीपुरवठा होत असतो. वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे कमी-अधिक दाबामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वारंवार घडत असल्याचे समजते. गेल्या दोन महिन्यांत अशा चार-पाच घटना घडल्या आहेत. शुक्रवारी या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. धुकटन येथील दिवेकर पाड्याजवळील फुटलेल्या जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीनंतर कमी दाबाने टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आली.

Web Title: water drought in Vasai-Virar