उल्हासनगरात पाणी प्रश्‍न पेटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

उल्हासनगर - येथील प्रभाग १४ मध्ये पाण्याची टाकी असतानाही त्यात पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी भरउन्हात उपोषण सुरू केल्याने पाण्याच्या वाहिनी दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव झाली.

उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक १४ मध्ये वर्षभरापासून भीषण पाणीटंचाई आहे. महापालिकेची यंदा प्रथमच चारचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली. या प्रभागात मिताली सोनू चान्पूर, लीलाबाई आशाण, शेखर यादव, सुनील सुर्वे हे नगरसेवक निवडून आले; तसेच शिवसेनेने महापालिकेत जे स्वीकृत दोन नगरसेवक दिले ते अरुण आशाण आणि सुरेंद्र सावंत हेही याच प्रभागातले आहेत. हा प्रभाग शिवसेनेचा गड मानला जातो आणि याच प्रभागातील व्हीनस सिनेमा, अलंकार सोसायटी हा भाग वर्षभरापासून पाण्यापासून वंचित आहे. दिवस-रात्र पाणी पाणी करूनही पाणी सोडले जात नसल्याने अखेर आज सुर्वे, यादव, लीलाबाई आशाण, अरुण आशाण, सुरेंद्र सावंत, मिताली चान्पूर, युवासेना सल्लागार सोनू चान्पूर यांनी व्हीनस सिनेमा रोडवर भरउन्हात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पालिका प्रशासन या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाऊल उचलत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे नगरसेवक सुनील सुर्वे यांनी सांगितले.

Web Title: water issue in Ulhasnagar