wada
wada

वाड्यात भीषण पाणी टंचाई, 24 पाड्यात टँकरने पाणीपुरवठा 

वाडा : बारमाही मुबलक पाणी असणा-या वैतरणा, तानसा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या पाच नद्यांचे वरदान तालुक्याला लाभले आहे. मात्र नियोजन नसल्याने मार्च एप्रिल महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत 24 गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा केला जात असून टॅकरची मागणी वाढत आहे.

वाडा तालुक्यात 168 खेडी व 250 पाडे आहेत. तर 84 ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिककरण झाल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे मात्र त्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. तालुक्यात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील रोलिंग मिल्स, शीतपेये कारखाने बनविणा-या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. 

सरकारच्या धोरणानुसार कुपनलिका ही 200 फुटांपर्यत मारली जाते. मात्र 200 फुटांवर पाणी लागत नसल्याने मारलेल्या कुपनलिका ड्राॅय होतात. त्यामुळे हे धोरण सरकारने बदलून 300 फुटांपर्यत करावे अशी मागणी नागरिक करीत.  

सध्या वाडा तालुक्यात तुसे ग्रामपंचायत फणसपाडा, तरसेपाडा ओगदा ग्रामपंचायत सागमाळ, टोकरेपाडा, दिवेपाडा, जांभुळपाडा उज्जैनी ग्रामपंचायत साखरशेत, आंबेवाडी, उज्जैनी गावठण वरसाळे ग्रामपंचायत वांगडपाडा कुयलू ग्रामपंचायत भुरकुटपाडा, धिंडेपाडा, रोजपाडा, कातकरी वाडी, कुयलू गाव तोरणे ग्रामपंचायत तोरणे, चेंदवली, बेलसावर पाचघर ग्रामपंचायत पाचघर, तिळमाळ, सुतकपाडा, गावीतपाडा, शेरूचापाडा, उंबरदयाचा पाडा वि-हे ग्रामपंचायत वि-हे या 24 गावपाड्यात सध्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 

दीड किमी अंतरामुळे टॅकरला अडचणी 
टंचाई असलेल्या गाव पाड्यात दीड किमी अंतरापर्यत कोणतेही पाण्याचे स्तोत्र नसलेल्या गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा करण्याचा नियम आहे. या नियमामुळे अनेक गाव पाड्यात टंचाई असताना सुद्धा शासन टॅकरने पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे हा नियम रद्द करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

सध्या वाडा तालुक्यात 24 गाव पाड्यात टॅकरने पाणीपुरवठा केला जात असून ही मागणी वाढत असून टंचाई गावाला तत्काळ टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
- प्रमोद भोईर, शाखा अभियंता, पाणी पुरवठा विभाग 

पंचायत समिती वाडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com