Mumbai Rains : कल्याणमध्ये अख्खा पेट्रोल पंप पाण्यात; 100 जण अडकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

कल्याण टिटवाळा पोलिसांनी तिघांना वाचवले 
रायता परिसरात दोन डोंगराच्यामध्ये एका कुटुंबीयांचे 3 लोक अडकले होते. घराचा पत्रा तोडून त्यावर बसले होते. परिसरात 10 फूट पाणी साचले होते. अखेर पोलिसांनी बचावकार्य राबवून तिघांना वाचविले.

कल्याण : मुसळधार पावसामुळे कल्याण शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आल्याने पेट्रोल पंपात पाणी घुसले आहे. याठिकाणी सुमारे 100 जण अडकले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

कल्याण-नगर रस्त्यावरील मुरबाडजवळ पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका पेट्रोल पंपावर 100 हुन अधिक जण अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाची टीम रवाना झाल्याचे, केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पेट्रोप पंपाच्या छतावर नागरिकांनी आसरा घेतला आहे.

कल्याण टिटवाळा पोलिसांनी तिघांना वाचवले 
रायता परिसरात दोन डोंगराच्यामध्ये एका कुटुंबीयांचे 3 लोक अडकले होते. घराचा पत्रा तोडून त्यावर बसले होते. परिसरात 10 फूट पाणी साचले होते. अखेर पोलिसांनी बचावकार्य राबवून तिघांना वाचविले.

कल्याण-नगर महामार्ग झाला बंद
मुसळधार पावसामुळे रायते गावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कल्याण नगर मार्ग बंद झाला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक लोकं अडकून पडले आहेत. तर कल्याणातील पूर्व आणि पश्चिम परिसरात असणारा घोलप नगर, शिवाजी चौक, रेतीबंदर, खडेगोळवलीसह डोंबिवलीतही सखल भागात पाणी साचले आहे. तर सकाळपासून पाऊसही पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water logging in petrol pump in Kalyan many people trapped