
Mumbai Water Metro
Sakal
नितीन बिनेकर
मुंबई : कोचीच्या धर्तीवर मुंबईतही ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) या अनुभवी संस्थेची निवड करण्यात आली आहे.