जलवाहिनी दुरुस्तीमुळे माहीममध्ये कारंजा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

खार रोड - माहीम विभागातून जाणाऱ्या ९६ इंचाच्या व्यासाच्या तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पम्पिंग व्हॉलमधून पाणी सोडल्याने बुधवारी (ता. ३०) काही फूट उंच पाण्याचे कारंजे उडू लागल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दुपारच्या कडकडीत उन्हात पाण्याचे तुषार झेलण्यासाठी मुलांबरोबर अनेकांची झुंबड उडाल्याने वांद्रेहून माहीमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

माहीम विभागात तानसा जलवाहिनीवर भायखळा जल अभियंता विभागाकडून दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. जलवाहिनीवर पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात हवेचा दाब प्रवाहित होत असतो. पाण्याचा दाब कमी केल्यावर जलवाहिनेवर दुरुस्ती करणे सोपे होते. त्यानुसार बुधवारी घाटकोपर जल अभियंता विभाग हद्दीत येत असलेल्या माहीम विभागातून जाणाऱ्या जलवाहिनीतील पाण्याचा दाब कमी करण्यासाठी पम्पिंग व्हॉलमधून पाणी सोडण्यात आले. हवेचा दाब जास्त असल्याने काही मीटर उंच पाण्याचे कारंजे उडत होते. घाटकोपर विभागातील ३५ अभियंत्यांची टीम जलवाहिनेवर काम करत आहे. पाण्याचा दाब कमी झाल्याने जलवाहिनेवर दुरुस्ती करणे सोईचे झाले, असे घाटकोपर विभाग ज्युनिअर जल अभियंता अधिकारी निरंजन चौधरी यांनी सांगितले.

Web Title: water pipeline repair

टॅग्स