दोन आणि तीन डिसेंबरला मुंबईत कुठे बंद राहणार पाणीपुरवठा, लगेच नोंद करून घ्या

समीर सुर्वे
Saturday, 28 November 2020

दादर सेनापती बापट मार्गावर 1450 मिली मिटर व्यासाच्या जलवाहीनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका 2 ते 3 डिसेंबर या काळात हाती घेणार आहे.

मुंबई, ता. 28: दादर सेनापती बापट मार्गावर 1450 मिली मिटर व्यासाच्या जलवाहीनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका 2 ते 3 डिसेंबर या काळात हाती घेणार आहे. त्यामुळे दादर, प्रभादेवी माहिम या भागात पाणी पुरवठा होणार नाही. तर सात रस्ता आणि धोबीघाट या परीसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात या ब्रिटीश कालीन जलवाहीनेच्या गळती दुरुस्तीचे काम होणार आहे. या विभागातील नागरीकांनी आदल्या दिवशी पाणी साठवून ठेवावे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

2 डिसेंबर : 

  • दुपारी 2 ते 3 : डिलाईल रोड
  • दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7 : ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, लोअर परळ
  • संध्याकाळी 4 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 : लोअर परळ, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्‍चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्‍चिम) आणि दादर (पश्‍चिम) परिसर

महत्त्वाची बातमी : कसा होता निलकानंतरचा 'नोव्हेंबर २०१९' चा महिना, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा लहानसा रिकॅप

3 डिसेंबर

  • पहाटे 4.30 ते सकाळी 7.45  - डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही

कमी दाबाने पाणी पुरवठा 

  • गुरुवार 3 डिसेंबर रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 - क्‍लार्क रोड, धोबी घाट, सातरस्ता या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. 

महत्त्वाची बातमी : ED आणि CBI वर निशाणा साधणारं संजय राऊतांचं ठाकरी पद्धतीचं विशेष व्यंगात्मक ट्विट

( संपादन - सुमित बागुल )

water pipeline repair work no water in dadar and lower parel area on second and third December


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water pipeline repair work no water in dadar and lower parel area on second and third December