पाणथळ जागेवरील भराव ‘जैसे थे!’

पाणथळ जागेवरील भराव ‘जैसे थे!’
पाणथळ जागेवरील भराव ‘जैसे थे!’

नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या पाणथळ समितीने उरणमधील पाणथळीच्या संरक्षणार्थ ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले असतानाही सिडको प्रशासन मात्र याबाबत ढिम्म असल्याचे चित्र आहे. पाणथळ समितीने सिडको प्रशासनाला भेंडखळ पाणथळीवर झालेला भराव हटवण्याच्या सूचना केल्यास ८ महिने उलटले तरीही या परिसरात भराव जैसे थे पडून असल्याचे पाहायला मिळत आहे. 

भेंडखळ पाणथळचा समावेश नॅशनल ‘वेटलंड अटल्स’अंतर्गत होतो. उरणमधील पाणथळीवर सर्रास होत असलेल्या भरावाबाबत मार्च महिन्यात पाणथळ समितीची सुनावणी झाली होती. या सुनावणीत दोन आठवड्यात भेंडखळ येथील पाणथळ जागेवर झालेला भराव काढण्याच्या सूचना सिडकोला करण्यात आल्या होत्या. सिडको प्रशासनाने मात्र या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. समितीच्या बैठकीस ८ महिने उलटले तरी या ठिकाणचा भराव काढण्यात आलेला नाही. भेंडखळ पाणथळ येथे अनेक प्रजातींचे स्थलांतरित, विदेशी पक्षी आढळतात. उरणमधील बेलपाडा, पाणजे पाणथळ पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासासाठी येथे बीएनएचएससारख्या संस्थेच्या पक्षी अभ्यासकांपासून हौशी पक्षी निरक्षकांपर्यंत निसर्ग, पक्षीप्रेमी भेट देत असतात. 

काही दिवसांपूर्वीच पाणथळ समितीच्या सदस्यांनी व एकविरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी भेंडखळ परिसरास भेट दिली होती. त्या वेळी त्यांना तेथील भराव ’जैसे थे’च असल्याचा आढळला. याबाबत समिती सदस्यांनी व पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. 

जेथे भराव झालेला आहे; तो पाणथळ भाग नाही. तीन महिन्यांपूर्वी आम्ही ज्या ठिकाणी भराव केला होता, तो काढला आहे. मात्र ती जागा पाणथळ नाही. पावसाचे पाणी साठलेले ठिकाण पाणथळ होऊ शकत नाही. 
- प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी, वन आणि पर्यावरण विभाग, सिडको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com