वांद्रेनजीकचा समुद्रकिनारा सर्वात दूषित, पाण्यातील 'ई कोलाय' विषाणूचं प्रमाण पाचपट अधिक

वांद्रेनजीकचा समुद्रकिनारा सर्वात दूषित, पाण्यातील 'ई कोलाय' विषाणूचं प्रमाण पाचपट अधिक

मुंबईतील वांद्रेनजीकचा समुद्र मुंबईतील सर्वाधिक दुषित आहे. शौचालयाच्या पाण्यात आढळणारा ई कोलाय हा विषाणू या परीसरातील पाण्यात निकषापेक्षा तब्बल 5 पट जास्त आहे. तर वरळीत हे प्रमाण तीप्पट आहे.

मुंबई महानगरपालिकेने यंदाचा पर्यावरण स्थिती दर्शक अहवाल महासभेच्या पटलावर मांडला. त्यात वांद्रे, वरळी आणि कुलाबा किनाऱ्यावरील पाण्यातील दर्जाची माहिती प्रसिध्द केली आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या निकषाप्रमाणे 100 मिली पाण्यात 100 एककपर्यंत 'ई कोलाय' असणे गरजेचे आहे. तर, वांद्रे येथे हे प्रमाण किमान 60 आणि कमाल 500 एकक एवढे आहे. तर, वरळी येथे किमान 78 आणि कमाल 310 एकक आणि कुलाबा येथे किमान 60 आणि कमाल 150 एकक एवढे आहे.

ई कोलाय हा विषाणू प्रामुख्याने मानवी तसेच प्राण्यांच्या शौचात, गटरात तसेच मलवाहीन्यांमध्ये आढळतो. मुंबईत दररोज 2800 दशलक्ष लिटर मलजल तयार होते. तर, मोठ्या प्रमाणात मलजल थेट खाड्या आणि नाल्यांमधून समुद्रात जाते.

वांद्रे मलजल प्रक्रीया केंद्राच्या 1 किलोमिटर  परीसरातील समुद्रातून हे पाण्याचे नमुने घेतले होते. त्याचबरोबर वरळी आणि कुलाबा येथील प्रक्रीया केंद्रीच्या परीसरातील 1 किलोमिटरवरुन हे नमुने घेण्यात आले होते.

मिठी नदी माहीम आणि वांद्रेमधून अरबी समुद्रात मिसळते. या नदीतून मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रीत आणि मैलापाणी समुद्रात जात असल्याने या परीसरातील पाणी सर्वाधिक दुषित आहे.

मुंबई महापालिका काय करतेय 

मुंबई महापालिका मलनिःसारण प्रकल्पाअंतर्गत शहरात तयार होणारे सर्व मैला पाणी पंपिंग स्टेशन पर्यंत आणण्याचा महत्वपुर्ण प्रकल्प गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरु आहे. यामध्ये जून्या आणि जिर्ण वाहीन्या दुरुस्त करणे, त्यांची क्षमता वाढविणे तसेच नव्या मैला वाहिन्या बांधणे अशी कामे सुरु आहेत.

8 ठिकाणी प्रर्किया केंद्र उभारण्यासाठी निवीदा प्रक्रीया सुरु आहे. हे प्रकल्पही गेल्या किमान 10 वर्षा पासून रखडले आहे. या प्रक्रीयाकेंद्रात मैला पाणी शुध्द करुन ते नैसर्गिक स्त्रोतात सोडण्याबरोबरच त्याचा पिण्या व्यतिरीक्त वापर करण्याचा विचारही पालिका करत आहे.

मिठीसह सर्व नद्यांच्या शुध्दिकरणाचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यात नद्यांमध्ये येणारे सांडपाणी, मैलापाणी अडवून त्यावर प्रक्रीया करण्यात येणार आहे. याबाबतच्या निवीदा प्रक्रीया शेवटच्या टप्प्यात आहेत.

water quality in the sea near bandra is worst report submitted by BMC in mahasabha

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com