मुंबई पोलिसांनी केलेली फिर्याद न्यायालयाने केली रद्दबातल, तबलिघीमधील आठजण आरोपमुक्त

मुंबई पोलिसांनी केलेली फिर्याद न्यायालयाने केली रद्दबातल, तबलिघीमधील आठजण आरोपमुक्त

मुंबई, ता. 25 : कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवलेल्या आठ परदेशी नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवी दिल्लीमध्ये झालेल्या तबलिघी परिषदेला या आठजणांनी हजेरी लावली होती. मुंबई पोलिसांनी लावलेली फिर्याद न्यायालयाने रद्दबातल केली आहे.

मार्च महिन्यामध्ये झालेल्या जमात ए मरकझ परिषदेत म्यानमारमधील आठ नागरिकांचा समावेश होता. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर साथीचा आजार पसरविणे, नियमांचा भंग करणे, धार्मिक प्रचार करणे आदी आरोप ठेवले होते. याविरोधात आठजणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

याचिकादारांकडून रोगाचा संसर्ग झाला असे स्पष्ट करणारे पुरावे अभियोग पक्ष दाखल करु शकलेला नाही. तसेच त्यांनी धार्मिक भाषण दिले किंवा प्रचार सभा घेतल्याचेही आढळले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तपास यंत्रणानी आरोपपत्रातही याबाबत स्पष्टता दिलेली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी दाखल केलेली फिर्याद खंडपीठाने रद्दबातल केली.

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपींंनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले आणि ते मुंबईत पर्यटक म्हणून फिरत होते आणि धार्मिक प्रसार करीत होते.

Complaint filed by Mumbai Police dismissed by court eight accused in Tablighi acquitted

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com