Water reduction : मुंबईमध्ये २४ तासांसाठी १० ते २० टक्के पाणीकपात

पश्चिम उपनगरांत पुढील २४ तास १० टक्के, तर लोअर परळ, दादर आणि कुलाबा या विभागात २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
Water Shortage
Water Shortageesakal

मुंबई - पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा वीज उपकेंद्राकडून होणारा वीजपुरवठा सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास खंडित झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज पारेषण कंपनीकडून प्रयत्न सुरू असून पालिकेच्या जल विभागाने पर्यायी वीजपुरवठा सुरू केला आहे.

मात्र, यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागणार असून पश्चिम उपनगरांत पुढील २४ तास १० टक्के, तर लोअर परळ, दादर आणि कुलाबा या विभागात २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकळी ११ वाजेपर्यंत कमी दाबाने पूर्ववत करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले.

वीज पारेषण कंपनीकडून पडघा १०० केव्ही वीज उपकेंद्र ते पांजरापूर ३ए १०० केव्ही वीज उपकेंद्र या संपूर्ण मार्गावर वीज बिघाड कुठे झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. पर्यायी वीजपुरवठ्याआधारे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com