water scarcity
water scarcitysakal media

मोखाड्यात फेब्रुवारीतच पाणी टंचाईची ठिणगी; टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढणार ?

मोखाडा : ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मोखाड्यात (Mokhada) उन्हाचा तडाखा सुरू होताच पाणीटंचाईला (water scarcity) सुरुवात होते. या वर्षीही मोखाड्यात फेब्रुवारीच्या पंधरवाड्यानंतरच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तालुक्यातील दापटी १, दापटी २, ठवळपाडा, हेदवाडी आणि आसे स्वामीनगर या ५ गावपाड्यांना तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा (Tanker water supply) सुरू केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १५ दिवस अगोदरच टंचाईला सुरुवात झाली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे, टंचाईग्रस्त गावपाड्यांची (villages) संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

water scarcity
मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅन मुंबईत; प्रिया दत्त यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिवर्षी मोखाड्यात दोन हजार ७०० ते तीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र, खडकाळ आणि डोंगर उताराचा हा भाग असल्याने येथे भूगर्भात पाणी न साचता ते वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी ९ मार्चला टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि टंचाईग्रस्त गावपाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या अतिदुर्गम दापटी १ आणि दापटी २ या गावांना एक टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

बुधवारपासून (ता. ९) आसे स्वामीनगर, ठवळपाडा आणि हेदवाडी येथे दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी दिली. तसेच कुंडाचापाडा, भोवाडी, ब्राह्मणगाव, विकरीचापाडा आणि नावळ्याचा पाडा या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

टंचाईग्रस्त पाडे वाढणार

गेल्या वर्षी तालुक्यात ८७ गावपाड्यांना २३ टॅंकरद्वारे टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात आला होता. या वर्षी उन्हाचा तडाखा फेब्रुवारीतच जाणवू लागल्याने, फेब्रुवारीपासून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com