
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत देखील पावसाच्या धारा कोसळत आहेत. त्यामुळे मुंबई जलाशयांत वाढ होत आहे. मात्र अशातच मुंबईकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईतील वांद्रे भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.