

Thane Water Scarcity
ESakal
ठाणे : ठाणेकरांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणी पुरवठा करणारी हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनी वरील ७०० मि.मी व्यासाची झडप नादुरूस्त झाल्याने त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. परिणामी २ जानेवारीला घोडबंदरसह शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.