esakal | मुंबई : परळ, नायगावमधील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : परळ, नायगावमधील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : परळ (paral) , नायगाव (Naygaon) परिसरात ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ६ ऑक्टोबर १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. गोलंजी टेकडी ७५० मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम करण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणे : थकबाकीदारांना दणका : एक लाख जणांचा वीजपुरवठा खंडित

त्यामुळे हा पाणीपुरवठा खंडित होईल, असे पालिकेने सांगितले आहे. या परिसरातील रहिवासांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या भागांत निर्जळी परळ गाव येथील गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना ५ ऑक्टोबर रोजी दररोज दुपारी २.४५ ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत. "काळेवाडी परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना रात्री ८.३० ते ११.३० पुरवठा नाही..

loading image
go to top