Mumbai Water Supply: मुंबईकरांनो लक्ष द्या! अंधेरीसह 'या' परिसरात ११ तास पाणीपुरवठा बंद राहणार, कधी कुठे आणि का? वाचा...
Mumbai Water cut: महापालिकेने जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलणे आणि पाईपलाइनची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका के-पश्चिम विभागांतर्गत येणाऱ्या अंधेरी पश्चिम, वर्सोवा, विलेपार्ले-पश्चिम, जुहू, लोखंडवाला आणि जोगेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून ते शुक्रवारी पहाटे १ वाजेपर्यंत तब्बल ११ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.