
डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आणि बारवी गुरूत्व वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी मध्यरात्रीपासून केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ६) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ७) रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.