

Mumbai Water Supply
ESakal
मुंबई : दादर , अंधेरी पूर्व , सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सोमवारी (ता. २२) सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत (एकूण ८७ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, दादर, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत देखील बदल होणार आहे, याची नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा अशी असे आवाहन पालिकेने केले आहे.