दोन रुपयांत भागणार तहान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

ठाणे - कडक उन्हामुळे रेल्वे स्थानकावर पाण्याची मागणी वाढली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात आता इंडियन रेल्वे कॅण्टीन ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) पाच वॉटर व्हेण्डिंग मशीन बसवणार आहे. यातून दोन रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत पाणी विकत घेता येणार आहे. आठवडाभरात या मशीन स्थानकात बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे २४ तास ‘आरओ’ आणि यूव्ही फिल्टर केलेले शुद्ध पाणी प्रवाशांना मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या फलाटांवर पाणपोईचा पर्याय होता. अनेक पाणपोईंकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्यामुळे त्या बंदच असतात. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे उपाहारगृहातून बाटलीबंद पाण्याची खरेदी करावी लागते. हे बाटलीबंद पाणी सुमारे १० ते १५ रुपयांपर्यंत मिळते. रेल्वेच्या फलाटांवर केवळ रेल्वे नीर मिळते. त्याचीही किंमत एवढीच असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत होता. या प्लास्टिकच्या बाटलीमुळे स्थानक परिसरात प्लास्टिक कचरा होत होता. हे टाळण्यासाठी रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी आरआयसीटीसीद्वारे मध्य रेल्वेच्या स्थानकात या सुविधेची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणाऱ्या पाच मशीन ठाणे स्थानकात दाखल झाल्या आहेत. त्यांच्या जोडणीचे काम सुरू आहे. आठवडाभरात या मशीन सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

काय आहे वॉटर व्हेण्डिंग मशीन?
दिवसभर  अल्प दरात या मशीन शुद्ध पाण्याचा पुरवठा करतील. त्यातून दोन रुपयांना ग्लासभर पाणी, पाच रुपयांत बाटलीभर पाणी घेता येणार आहे. आठ रुपयांना बाटलीमधून पाण्याचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक फलाटावर एक मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या फलाटावरील प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार आहे. एकूण पाच मशीन बसवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी पश्‍चिम रेल्वेवर अशा मशीन बसवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पहिल्यांदा याची जोडणी केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात येणार आहे.

Web Title: water vending machine