CSMT Railway Station - अडीच वर्षानंतर सीएसएमटी स्थानकात वॉटर वेडिंग मशीन!

तब्बल अडीच वर्षानंतर रेल्वे सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा अत्याधुनिक वॉटर वेडिंग मशीन सुरू झाल्या आहे.
Water Vending Machine
Water Vending Machinesakal
Summary

तब्बल अडीच वर्षानंतर रेल्वे सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा अत्याधुनिक वॉटर वेडिंग मशीन सुरू झाल्या आहे.

मुंबई - तब्बल अडीच वर्षानंतर रेल्वे सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा अत्याधुनिक वॉटर वेडिंग मशीन सुरू झाल्या आहे. त्यामुळे आता प्रवाशांना किफायतशीर दरात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.सध्या सीएसएमटी स्थानकांवर पाच वॉटर वेडिंग मशीन सुरू झाल्या असून उर्वरित स्थानकांवर वॉटर वेंडीग बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबईत दररोज उपनगरीय लोकल सेवामधून ७५ लाख, तर लांब पल्य्याच्या गाड्यांने सुद्धा लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे सर्वाधिक व्यस्थ विभागामध्ये मुंबईच्या समावेश होते. या प्रचंड संख्येच्या रेल्वेप्रवाशांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी रेल्वेने पाणपोयांची सोय असली तरी अनेक स्थानकांत त्या बंद पडलेल्या असतात. त्यामूळे रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि किफायदेशीर दरात पाणी उपलब्ध व्हावेत म्हणून आयआरसीटीसीने रेलनीरचा बॉटल पर्याय प्रवाशांना उपलब्ध करू दिला होता. त्याच पाठोपाठ वॉटर व्हेंडींग मशिन सुद्धा सुरु केली होती. मात्र वॉटर व्हेंडींग मशिन गेल्या अडीच वर्षापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना रेलनिरच्या पाण्याचा बॉटल घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र, आता मध्य रेल्वेने नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत मुंबई विभागात १७ वॉटर वेडिंग मशीन लावण्यात येणार आहे. त्यापैकी सीएसएटमी स्थानकात पाच वॉटर वेडिंग मशीन सुरू झाल्या आहेत. उर्वरित स्थानकात मशीन बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पाणी दर -

पाणी- बाटली - विना बाटली

  • ३०० मी.ली - ८ रुपये, - ५

  • ५०० मी.ली - १२ रुपये, - ८

  • १ लीटर - १५ रुपये, - १२

'या' स्थानकांत मशीनी -

  • दादर - ५

  • ठाणे - ४

  • कुर्ला - १

  • घाटकोपर - १

  • विक्रोळी - १

डिजिटल पेमेंट सुविधा -

वॉटर वेडिंग मशीनचे निरीक्षक प्रफुल कदम यांनी सकाळला सागितले की, मेघदूत वॉटर वेडिंग मशीन अत्याधुनिक आहे. प्रवाशांसाठी २४ तास सुरू असणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना पाणी खरेदीसाठी सुट्टे पैशांची गरज लागणार नाही. कारण या मशिला डिजिटल पेमेंटसाठी डिजिटल क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या मोबाईल अप्लिकेशनमधून क्यूआर कोड स्कॅन करून पाणी खरेदी करता ये आर आहे.

रेल्वेला मिळणार महसूल -

मध्य रेल्वेने वॉटर वेडिंग मशिन करिता एका खासगी कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. दर वर्षी एका यंत्रासाठी दीड लाख याप्रमाणे २५ लाख ५० हजार रुपये रेल्वेला महसुल मिळणार आहे. सध्या १७ वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे त्यानंतर उर्वरित रेल्वे स्थानकावर टप्प्याटप्प्याने या मशीनने बसवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com