
डोंबिवली : डोंबिवलीचे प्रवेशद्वार असलेला डॉ. आंबेडकर मार्ग हा पाण्याखाली गेला आहे. कल्याण शीळ रोडवर रिजन्सी अनंतम येथून पाण्याचा मोठा प्रवाह वाहून येत आहे. त्यासोबतच रस्त्याच्या बाजूचे एमआयडीसी मधील मोठे नाले भरून वाहत आहेत. हे पाणी रस्त्यावर आले असून सेवा रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या चौकात शेजारीज खासदार डॉ. शिंदे यांचा देखील बंगला असून त्यात ही पावसाचे पाणी शिरले आहे.