
ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत चेना नदीजवळ ओढ्याचे पाणी ठाणे-फाउंटन वाहिनीवर आल्याने घोडबंदर मार्ग सहा तास पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या रस्त्यावर वाहने अडकून पडल्याने मीरा-भाईंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर माजिवड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका चाकरमानी, शालेय विद्यार्थी आणि गुजरात, पालघर, वसईला जाणाऱ्या वाहनांना बसला. अनेक जड-अवजड वाहने कोंडीत अडकून पडल्याने मुंबई, नाशिक, नवी मुंबई, मुंब्रा बायपास मार्गाला देखील फटका बसला. ठाणे शहरातील अंतर्गत रस्ते, स्टेशन रोड कोंडीत अडकला होता.