शहांच्या दौऱ्यामुळे आम्ही नजरकैदेत : संजय निरुपम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई : "आम्हाला नजरकैदत ठेवले जात आहे", असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज (बुधवार) केला. निरुपम यांच्या निवासस्थानी आज मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अचानक तैनात करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शहरात आज कडक पोलिस बंदोबस्त केला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरुन सदर कारवाई केली जात आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. "कदाचित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरमुळे आम्हाला नजरकैद केले जात आहे. आमच्या प्रश्नांची त्यांना भीती वाटत असावी." असा आरोप निरुपम यांनी केला. "आजच हा पोलिस बंदोबस्त का केला. आम्ही असा काय गुन्हा केला आहे की, ज्यासाठी आम्हाला नजरकैदत ठेवले जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. 
 
Web Title: we are being jugllary says sanjay nirupam