esakal | स्टॅन स्वामींच्या सामाजिक कार्याचा आम्हाला मोठा आदर - हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Father stan swamy

स्टॅन स्वामींच्या सामाजिक कार्याचा आम्हाला मोठा आदर - हायकोर्ट

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले आणि नुकतेच मृत्यू पावलेले ख्रिस्ती धर्मगुरु आणि मानवाधिकार कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांच्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई हायकोर्टानं आदर व्यक्त केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळं स्वामी यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या जामीन याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली यावेळी कोर्टानं म्हटलं की, "स्टॅन स्वामी हे चांगलं व्यक्ती होते त्यांच्या कार्याचा कोर्टाला मोठा आदर आहे." (We have great respect for the social work of Stan Swamy says Mumbai HC aau85)

८४ वर्षीय ख्रिस्ती धर्मगुरु असलेले स्टॅन स्वामी यांचा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये कार्डियाक अरेस्टनं मृत्यू झाल्याचं जेव्हा हायकोर्टाला सांगण्यात आलं. त्यानंतर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठानं स्टॅन स्वामी यांच्या जामीन याचिकेवर ५ जुलै रोजी हे निरिक्षण नोंदवलं होतं.

दरम्यान, न्या. शिंदे यांनी म्हटलं की, "आम्हाला व्यस्ततेमुळं वेळ मिळत नाही पण मी स्वामी यांच्या अंत्यसंस्काराचा सोहळा पाहिला. स्वामी हे खूपच चांगले व्यक्ती होते. कायदेशीररित्या त्यांच्याविरोधात जे काही झालं तो भाग वेगळा. पण त्यांनी समाजाची मोठी सेवा केली आहे. त्यांच्या या कार्याचा आम्हाला मोठा आदर आहे."

loading image