राहुल गांधीची विकेट आम्हीच काढणार - रामदास आठवले 

रविंद्र खरात 
गुरुवार, 24 जानेवारी 2019

कल्याण - आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या मागे काही लोक लागले आहेत. मात्र मोदी आणि मी देशासाठी चांगले काम करत असून, राहुल गांधीची विकेट आम्हीच काढणार , असे प्रतिपादन आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केले. कल्याण पूर्वमध्ये कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ते बोलत होते.

कल्याणपूर्व मधील पोटे मैदानमध्ये उत्कर्ष प्रतिष्टानच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवाला शनिवार ता 19 जानेवारी रोजी सुरुवात झाली, समारोप रविवार ता 27 जानेवारी रोजी होणार आहे. 

महोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजे बुधवार ता 23 जानेवारी रोजी कोकण महोत्सवामध्ये आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधील नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे निवडणूक लढविणार असणार असल्याचा चर्चेचा धागा पकडला. ते म्हणाले मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी चांगले काम करत असताना काही लोक मागे आहेत. राहुल गांधीची विकेट आम्हीच काढणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

कोकण महोत्सव आयोजक संजय मोरे आणि त्यांच्या सहकारी वर्गाचे कौतुक करत पुढे म्हणाले, कुठल्याही निवडणूकीमध्ये कुठल्याही पक्षाचे चिन्ह अथवा पाठबळ न घेता जिंकणे खूप कठीण आहे. ते काम आमदार गणपत गायकवाड यांनी करून दाखविले आहे. कारण गायकवाड हे सर्व सामान्य नागरिकांचे काम करत असून, सध्या भाजपा सोबत आहेत. त्यांना आमच्या पक्षाचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेना भाजपा युती म्हणून निवडणूक लढणार असल्याने चिंता करण्याची गरज नसल्याचे आठवले म्हणाले.

यावेळी आपल्या भाषणात कल्याण पूर्वमध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे. ते बैठ्या चाळीत राहत आहेत, तर काहिना राहण्यासाठी घरही नाही. त्यांचे राहणीमान आणि जीवनमान सुधारण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत आठवले साहेबांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली. 

यावेळी आठवले यांच्या हस्ते जागतिक किर्तीचे अक्षर गणेश कलाकार राज कांदळगावकर, प्रसिद्ध कलाकार दादूस, उद्योग पती शशांक सांडू यांचा कोकण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खेड दापोलीचे आमदार संजय कदम, आयोजक संजय मोरे, परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: We will take Rahul Gandhi's wicket - Ramdas Athavale