
मुंबई : तलाव क्षेत्रांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मुंबईच्या सर्व तलावांमध्ये ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंचा विभागाने सुरू केली आहे. मुंबई दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि ठाणे, भिवंडी महापालिकेला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मुंबई महापालिकेकडून करण्यात येतो. मुंबईला दरवर्षी एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. त्यापैकी, ५,८२, १७५ दशलक्ष लिटर पाणीसाठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जमा झाला आहे.