Mumbai Weather Update: मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला

मिलिंद तांबे
Monday, 25 January 2021

राज्यभरात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा खाली गेल्याचे दिसते. पुढील 48 तासांत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्यभरात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा खाली गेल्याचे दिसते. पुढील 48 तासांत पारा आणखी खाली जाण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मुंबई, कोकण, जळगाव, नाशिक परिसरात बोचरी थंडी सुरू झाली आहे. राज्यात जळगाव मध्ये सर्वाधिक किमान तापमान नोंदवले गेले असून तेथे तापमान 10 ℃ इतके खाली आले आहे. 

त्यानंतर जळगाव 10 ℃ , नाशिक 10.4 ℃,मालेगाव 12.2 ℃,पुणे 13.6 ℃,सातारा 15.5 ℃,डहाणू 18.2℃, ठाणे 18.6 ℃ इतके नोंदवले गेले आहे. तर उस्मानाबाद 16.4, माथेरान 16 , बारामती 14.9,जालना 17.3,सांगली 18.2, परभणी 17.1 ,सोलापूर 17.5 अंश सेल्सिअस इतके आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील गारठा देखील गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. सांताक्रूझ 16.4 ℃ तर कुलाबा 18.5 ℃ तापमान नोंदवले गेले आहे. पुढील 48 तासात पारा आणखी खाली जाण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उप संचालक के एस होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा- मुंबईत तीन दिवस हवेची पातळी खालावली, संपूर्ण शहरात खराब हवेची नोंद

जम्मू-काश्मीरपासून उत्तर-पूर्व दिशेने वारे वाहणे सुरू झाले आहे. दिल्लीसह उत्तरे कडील भागातील पारा ही खाली गेला आहे. परिणामी उत्तर आणि मध्य भागातील मैदानी भागांमध्ये थंडीचा कडका वाढला असून त्यानंतरच्या 3-4 दिवसांपर्यंत चालू राहिल.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Weather Update Mumbai Regional Meteorological Department cold mercury dropped


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather Update Mumbai Regional Meteorological Department cold mercury dropped