esakal | मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबईत सरकारी, पालिका तसेच खासगी प्रयोगशाळेची संख्या वाढवण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने दिवसाला साधारणतः 4000 ते 6,500 कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मुंबईत पूर्वी दररोज सरासरी 1400 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. ती संख्या कमी झाली असून आता 1200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य तपासणी तसेच कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीला चाचणी करता यावी यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.याप्रकारची परवानगी देणारे मुंबई हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य असून सध्या मुंबईत दररोज केवळ 200 कोरोना खाटांची आवश्यकता असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत उच्च न्यायालयाने सरकारला दिले 'हे' निर्देश...

मुंबईत सरकारी, पालिका तसेच खासगी प्रयोगशाळेची संख्या वाढवण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने दिवसाला साधारणतः 4000 ते 6,500 कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. मुंबईत पूर्वी दररोज सरासरी 1400 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. ती संख्या कमी झाली असून आता 1200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यातही लक्षणे असलेले केवळ 200 रुग्ण असून त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध करावे लागत असल्याचे माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. 

उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...​

मुंबईत कोरोना संसर्गाच्या विरोधात नियोजन बद्ध पाऊल उचलले गेली. विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहिमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन आणि फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबीरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक औषधांचा साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला यश मिळत असून मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... ​

रिकव्हरी रेट 70 टक्क्यांवर
मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून तो आता 51 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो 70 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर हा 1.39 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तर एकूण रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून 22 हजार 756 खाटा उपलब्ध आहेत. यापैकी 10 हजार 130 बेड तर 250 आयसीयू रिकामे आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे