सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... 

results
results

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी (ता.13) बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा निकाल 88.78 टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात 5.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 92.15 टक्के मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.19 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल 66.67 टक्के इतका लागला आहे. हा निकाल मंडळाच्या cbseresults.nic.in वर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या त्याच्या आधारे सीबीएसईमार्फत सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. देशभरातून 12 लाख 3 हजार 595 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 11 लाख 92 हजार 961 विद्यार्थांनी परीक्षा दिली. यामधून 10 लाख 59 हजार 80 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. बारावीचा निकाल यंदा 88.78 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 5.38 टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी 83.40 टक्के निकाल लागला होता. यंदा बारावीची परीक्षा 4984 केंद्रावर झाली. 

दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
निकालात 1 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना यंदा 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 57 हजार 934 तर 95 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 38 हजार 686 इतकी आहे.

  • ज्या विद्यार्थ्यांनी मंडळाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होणार आहे. 
  • तीनहून अधिक विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांचे गुण सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीप्रमाणे देण्यात आले आहेत. 
  • तसेच तीन विषयांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम दोन विषयांतील सरासरी एवढे गुण दिले आहेत. 
  • ज्या विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल वर्षभरातील कामगिरी, अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टीकलमधील गुणांनुसार देण्यात आले आहेत.

पुन्हा परीक्षेची संधी
या निकालाने ज्या विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही त्यांना सीबीएसई मंडळ पुन्हा परीक्षेची संधी देणार आहे. ही संधी केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांनाच मिळणार असून केंद्र सरकारशी चर्चा करून लवकरच या परीक्षेची तारीख मंडळामार्फत जाहीर होणार आहे.

पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के
पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के इतका लागला आहे. सर्वाधिक 97.67 टक्के निकाल ञिवेंद्रम विभागाचा लागला. तर पाटणा विभागाचा निकाल सर्वात कमी 74.57 टक्के इतका लागला आहे. चेन्नई विभागाचा निकाल 96.17 टक्के इतका लागला आहे.

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • 27 जुलैपासून सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत विद्यार्थी निकाला संदर्भात 1800118004 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 
  • विद्यार्थ्यांना डीजी लाँकर मोबाईल अँपच्या माध्यमातून मार्कशीट, स्कील सर्टीफिकेट डाऊनलोड करता येईल. 
  • यंदा सीबीएसईने गुणपत्रिकेवर 'नापास' या उल्लेखाऐवजी 'Essential Repeat' असा उल्लेख करण्यात आला आहे.

---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com