पश्‍चिम, मध्य रेल्वेवर शनिवारी, रविवारी ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - ओव्हरहेड वायर, लोहमार्ग आणि सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्‍चिम रेल्वे शनिवारी (ता. 13) मध्यरात्री आणि मध्य रेल्वे रविवारी (ता. 14) सकाळी मेगाब्लॉक घेणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, कल्याण ते ठाणे आणि हार्बरवर कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक घेतला जाईल. यामुळे काही लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5 पर्यंत दोन्ही दिशांच्या जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर चालविल्या जातील. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर कल्याण ते ठाणेदरम्यान सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 पर्यंत ब्लॉक असेल. या वेळेत या दोन स्थानकांदरम्यान सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावरून धावतील. त्यानंतर ठाणे स्थानकापासून जलद मार्गावर धावतील.

Web Title: western, central railway mega block