पश्चिम रेल्वेवर ७५ दिवसांचा वाहतूक ब्लॉक! अनेक लोकल रद्द, काहींच्या मार्गात बदल; मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

Western Railway: पश्चिम रेल्वेवर तब्बल ७५ दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्या रद्द होणार असून काही गाड्यांच्या मार्गात बदल केला जाणार आहे.
Western Railway 75 Days Block

Western Railway 75 Days Block

ESakal

Updated on: 

मुंबई : वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक ५च्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेने १ डिसेंबरपासून सलग ७५ दिवसांचा वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक १३ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार आहे. या काळात दररोज चार लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याने चर्चगेट-बोरिवली मार्गावरील प्रवाशांना फटका बसणार आहे. याशिवाय १५ लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या आणि अंतिम स्थानकांत बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या दादर, तर काही बोरिवली स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...