

Western Railway 30 days Traffic block
ESakal
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवलीदरम्यानच्या महत्त्वपूर्ण सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामासाठी आजपासून १८ जानेवारी २०२६पर्यंत ३० दिवसांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. कांदिवली-बोरिवली सहावी मार्गिका जानेवारीअखेरीस खुली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळणार आहे. तसेच लोकलची संख्या वाढून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.