
Western Railway Special Train
मुंबई : सणासुदीच्या काळात सुट्टीनिमित्त अनेकजण आपल्या मित्रांसोबत तसेच परिवारासह बाहेरगावी फिरायला जातात. तसेच या कालावधीत गावी जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. दिवाळी-छठपूजेनिमित्त देखील गावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.