

Mumbai Local Western Railway
Mumbai Local Train Block: डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सलग सुट्ट्या असल्यानं पर्यटनस्थळी मोठी गर्दी दिसून येतेय.काही महामार्गांवर वाहतूक कोंडीची स्थितीही निर्माण झालीय. दरम्यान, मुंबईत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय. २६ आणि २७ डिसेंबर रोजी कांदिवली बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील ३०० लोकल फेऱ्या २७ डिसेंबरला रद्द केल्या जाणार आहेत. तर पनवेलमध्येही ३० डिंसेबरपर्यंत ब्लॉक असणार आहे. सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार आहे.