

Western Railway Collect fine from ticketless passengers
ESakal
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवासीसंख्या वाढत आहे. वातानुकूलित गाड्यांसह सामान्य रेल्वे गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीचा फायदा घेत बहुतांश प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील विशेष तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२१ कोटी ६७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. या सात महिन्यांच्या काळात झालेली ही वसुली गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांनी अधिक आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा १४ टक्के जास्त वसुली झाली आहे.