

Vasai-Virar Railway track level raised by 400 mm.
ESakal
मुंबई : वसई-नालासोपारा-विरार परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली आहे. या अंतर्गत वसई-विरारदरम्यान विद्यमान रेल्वे रुळांची पातळी सुमारे ४०० मिलिमीटरने उंचावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध अभियांत्रिकी कामेही करण्यात येणार आहेत.