

Infrastructure Drive: Western Railway Launches Massive Demolition in Bandra East
नितीन बिनेकर
मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील गरीब नगर परिसरातील रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी पश्चिम रेल्वेने मंगळवारी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत पाच दिवसांत ५२०० चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी सुमारे २० टक्के काम पूर्ण झाले असून १०० हून अधिक बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.