

Western Railway Disruption
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे तसेच त्या व्हायरवर कपडा अडकल्यामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील मुंबई लोकलसेवा विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना आता पश्चिम रेल्वे मार्गावर घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड ते पालघर स्थानक दरम्यान काकीनाडा भावनगर एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याने गाड्यांचा खोळंबा झाल्याची माहिती आहे.