पश्‍चिम रेल्वेने केली 5 लाखांची दंडवसुली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

रेल्वे स्थानकात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांवर केली कारवाई 

मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती काही दिवसांवर आली आहे. यानिमित्ताने पश्‍चिम रेल्वे मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून 2 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये "स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत' या मोहिमेंतर्गत रेल्वेच्या परिसरात कचरा करणाऱ्या आणि स्थानकावर थुंकणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली.

या कारवाईसह वांद्रे टर्मिनसवर प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Railway fined Rs 5 lakh