esakal | भंगारातून मिळाले मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; पश्चिम रेल्वेकडून भंगाराचा ई-लिलाव...
sakal

बोलून बातमी शोधा

भंगारातून मिळाले मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; पश्चिम रेल्वेकडून भंगाराचा ई-लिलाव...

यापूर्वी गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये पश्चिम रेल्वेने 537 कोटी रूपये आणि 533 कोटीचे उत्पन्न भंगार विक्रीतून केले असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.

भंगारातून मिळाले मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न; पश्चिम रेल्वेकडून भंगाराचा ई-लिलाव...

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या माहामारीमुळे लॉकडाऊन असल्याने रेल्वेची सेवा गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मालवाहतूक आणि पार्सल वाहतुकीवरच सध्या रेल्वेचा भर आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील आणि कारखान्यातील भंगाराची विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ई-टेंडर काढून त्याची विक्री केली.

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रुळ, पोलादी स्लीपर आणि कारखान्यांमधून निघालेल्या भंगाराची पश्चिम रेल्वेने लॉकडाऊन काळात ऑनलाईन पद्धतीने विक्री केली आहे. त्यामधून सुमारे 45 कोटींचे उत्पन्नाची कमाई केली आहे. एप्रिल, मे महिन्यात कारखान्यातून निघालेल्या भंगार आणि रेल्वे मार्गावर पडून असलेल्या भंगाराची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात या भंगाराची विक्री केली आहे. महालक्ष्मी, साबरमती, प्रताप नगर डेपो, मुंबई, वडोदरा, रतलाम, अहमदाबाद, राजकोट आणि भावनगर विभागांमध्ये दर महिन्यात दोन वेळा ही ई-लिलाव करण्यात आले आहे. 

तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले...

पश्चिम रेल्वे मार्गावर झिरो भंगार मोहीम होती घेतली असून, यामध्ये आतापर्यंत कारखान्यात 100 टक्के, स्टेशनवर 65 टक्के, शेड डेपोमध्ये 50 टक्के आणि इतर विभागांमध्ये 30 टक्के भंगारची विक्री केली आहे. यापूर्वी गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये पश्चिम रेल्वेने 537 कोटी रूपये आणि 533 कोटीचे उत्पन्न भंगार विक्रीतून केले असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top