

ATVM Facilitator Jobs Recruitment
ESakal
पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आणि तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, जी एक सुवर्णसंधी आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि सुरत दरम्यानच्या विविध स्थानकांसाठी १७५ ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन फॅसिलिटेटरची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेमणुका दोन वर्षांच्या करारावर आधारित असतील. निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना तिकीट विक्रीवर कमिशनही मिळेल.