
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने पाच विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी या मार्गांवर धावणार आहेत. या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाड्यांचे आरक्षण २३ जुलैपासून सुरू होणार आहे.